पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससीच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या फेर पडताळणीला सुरूवात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दिव्यांग कोट्यातून पूजा खेडकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्रचे बोगस असल्याचा आरोप होत आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या या प्रकरणामुळे राज्य लोकसेवा आयोग सावध झाला आहे.

पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अँक्शन मोडवर आले आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्ग २ च्या ६२३ जागांची भरती प्रक्रिया राबवली होती. त्या भरती प्रक्रियेत दिव्यांग आरक्षणातून ९ उमेदवार पात्र झाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार आज फेर पडताळणीला सुरुवात करण्यात आली आहे. दोन वेळा आरोग्य तापसणीला गैरहजर असलेले बाळू दिगंबर मारकड हे आज तपासणीला हजर झाले आहेत.

बाळू मारकड यांची नाशिकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी झाली आहे. दिव्यांग आरक्षणातून पात्र झालेले बाळू मारकड हे तहसीलदार पदाच्या प्रथम यादीतील उमेदवार आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक अकोला आणि लातूर येथे ही फेर पडताळणी सुरू आहे. आरोग्य उपसंचालक आजच तपासणीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणार आहेत.

Protected Content