चंद्रानंतर आता सूर्याकडे : आदित्य एल-वन अंतराळात झेपावले !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडेच चांद्रयान-३ या यशस्वी मोहिमेच्या नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आदित्य एल-वन या मोहिमेच्या माध्यमातून थेट सूर्यावर स्वारी केली आहे.

देशातील पहिल्या सूर्य मोहिमेचा एक भाग म्हणून इस्त्रोने शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून  आदित्य एल-१  वाहन प्रक्षेपित केले. हे शनिवारी सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाने   प्रक्षेपित करण्यात आले. आदित्य ङ१ सूर्यातून येणारी उष्णता आणि उष्ण वारे यांचा अभ्यास करेल. हे सौर वार्‍याचे वितरण आणि तापमान यांचा अभ्यास करेल आणि सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आदित्य एल१ हे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले अंतराळयान असेल.

आदित्य एल-१ हे  अंतराळातील  लॅगरेंज पॉइंट  म्हणजेच एल-१ कक्षेत ठेवली जाईल. यानंतर हा उपग्रह २४ तास सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास करेल. हा उपग्रह पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या आजवरच्या इतिहासातील ही मोहिम एक मोठा आणि महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

Protected Content