मराठा आंदोलन हातळण्यात सरकार अपयशी : तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चालू असलेल्या उपोषणावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेचा रविकांत तुपकरांनी तीव्र निषेध करत सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

आपल्या ट्विट मध्ये तुपकरांनी म्हटले आहे की, “मराठा आंदोलन सरकारने खूप संवेदनशीलपणे हाताळने गरजेचे होते व आहे. आंदोलकांच्या भावना समजून घेणे खूप महत्वाच्या आहेत. परंतु जालन्यात अश्या पध्दतीने लाठीचार्ज करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हुकूमशाहीच..! कोणत्याही आंदोलनावर लाठीचार्ज करण्याची नवी पद्धत महाराष्ट्रात रुढ होत आहे का..?

आंदोलन करण्याचा, सत्याग्रह करण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. तो सरकारला हिरावून घेता येणार नाही. मराठा आरक्षण हा मराठा समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे यावर सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे व लाठीहल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे हे शोधून दोषींवर तातडीने कारवाई करावी ..! मराठा समाजातील तरुण पोरं आक्रमक आहेत व जश्याच तशे उत्तर देण्याची त्यांच्यात धमक आहे, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर नेत्यांना फिरणे मुश्कील होईल..!”

Protected Content