नवी दिल्ली वृत्तसंस्था । जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणकडे पाहिले जाते. मात्र, दीपिकाने जेएनयू हिंसाचाराला पाठिंबा दिल्यानंतर, तिच्याविषयी सुरु असलेल्या या वादामुळे अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्ड कंपन्यांनी तिच्यापासून दुर राहणे पसंत केल्याचे चित्र दिसत आहे.
दीपिकाने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावली होती. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकास्त्रदेखील झाले. इतकेच नाही तर काहींनी तिच्या ‘छपाक’ या चित्रपटाचाही विरोध करण्यास सुरुवात केली. तिच्याविषयी सुरु असलेल्या या वादामुळेच अनेक कंपन्या सतर्क झाल्या असून त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
एका ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीत दीपिका असल्यामुळे ही जाहिरात जवळपास २ आठवडे दाखवू नये, असे सांगितले आहे. तसेच दीपिका जेएनयूमध्ये गेल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे. तो वाद शमल्यानंतर ही जाहिरात परत दाखवा, असे एका कंपनीने आम्हाला सांगितल्याचे मीडिया बाइंग एजन्सीने सांगितले.