भोंग्यांबाबत शिवसेनाप्रमुखांनी पहिल्यांदा आवाज उठविला : उद्धव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भोंग्यांबाबत शिवसेनाप्रमुखांनी पहिल्यांदा आवाज उठविला होता, याची आठवण करून देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा विरोधकांना लक्ष्य केले आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आज शिवसंपर्क अभियानाबाबत आयोजीत बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा आक्रमकतेची चुणूक दाखविली आहे. ते म्हणाले की, भोग्यांवर सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता, असं म्हणत हिंदुत्वावर बोलण्यार विरोधकांची लायकी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशाचे शत्रू संपवण्यापेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. आम्ही बनावट आणि नकली हिंदुत्ववाद्यांना पोसले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विरोधकांना कळलं पाहिजे शिवसेनेची ताकद म्हणजे काय आहे ती, यांना मराठीबद्दल प्रेम नाही, यांना हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही. यांना फक्त स्वतःवर प्रेम आहे. हे आपल्या कर्मानं मरणार आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी टिकास्त्र सोडले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!