हिंदुत्व म्हणजे काय हे लोकांना चांगले माहित आहे -नितीन सरदेसाई

औरंगाबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसेच्या राज ठाकरे यांच्या सभांची इतरांच्या सभेशी तुलना कधीच होऊ शकत नाही. राज ठाकरे आणि हिंदुत्व म्हणजे काय हे लोकांना चांगले माहित आहे,  असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले.

नितीन सरदेसाई म्हणाले, “राज ठाकरे यांची सभा आणि इतरांची सभा यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. आमची सभा प्रचंड मोठी होणार आहे. लोकशाहीत ज्यांना जे करायचं आहे त्यांना ते करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभा घ्यावी लागतेय याचाच अर्थ राज ठाकरे जे बोलत आहेत ते लोकांना  पटते.  त्याचा सर्वांनी याचा धसका घेतला आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना हातपाय हालवावे लागत आहेत, कोणाचे हिंदुत्व खरे आणि कोणाचे बेगडी आहे. हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक अगोदर कसे होते आणि आता उलट वागत आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. जनता त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल असेही मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज ठाकरे यांच्या सभेची औरंगाबाद येथे उद्या १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. औरंगाबादची सभा देखील दमदार होईल, असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.  ईडीच्या प्रकरणानंतर संजय राऊत वाटेल ती बडबड करत आहेत. त्यांच्या सर्वच बाबींच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही असेही सरदेसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे.

 

आपल्या लोकांना सांगा, मग इतरांना सांगा
अजित पवार यांनी अगोदर आपल्या पक्षाच्या लोकांना चुकीची भाषा चालणार नसल्याचे सांगावे आणि मग इतरांना उपदेश करावा, अशी टीका नितीन सरदेसाई यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी महाराष्ट्रात चुकीची भाषा चालू देणार नसल्याचा इशारा दिला यावर प्रत्युत्तर दिले आहे.

ते पुढे म्हणाले कि, अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षातील नेते चुकीचे बोलत त्यांच्याकडे सर्वार्थाने प्रथम पहा, त्यांच्याच पक्षातील लोक स्टेजवरून बोलल्यानंतर लोक हसतात. यावर पहिल्याप्रथम त्यांना सांगा बाबांनो असे काही बोलू नका. त्यानंतरच त्यांनी दुसऱ्यांना सांगावे.

Protected Content