माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेसला जय महाराष्ट्र

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसला मराठवाडा क्षेत्रात मोठा दणका बसला आहे. त्यांच्या आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकिट दिले. या पाठोपाठ बसवराज पाटील यांनी देखील पक्ष सोडला आहे. ते येत्या दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. बसवराज पाटील हे २००९ ते २०१९ पर्यंत औसा मतदारसंघातून आमदार होते. या व्यतिरिक्त ते माजी ग्रामविकास मंत्रीही होते. त्यांनी काँग्रेसला सोडल्याने लातूर काँग्रेसला मोठा दणका बसला आहे.

Protected Content