मनोज जरांगेसह १०४१ जणांवर गुन्हे दाखल; पाच सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारकडून मराठा आंदोलनाविरूध्द आतापर्यंत १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ४२५ गुन्हे मराठावाडयात दाखल करण्यात आलेले आहे. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे मुंबईकडे जात होते, पण मराठा बांधवानी त्यांना समजवल्यामुळे भांबेरी गावात मुक्काम करून ते पुन्हा आंतरवाली सराटीला आले.

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. याव्यतिरिक्त मनोज जरांगे यांच्या पाच सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात सहकाऱ्यांमध्ये श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांचा समावेश आहे. या सर्वांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लावली आहे आणि इंटरनेट सेवाही बंद केली आहे.

Protected Content