भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू; अजिंठा चौकातील घटना

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात कामावरून घरी जात असलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीला भरधाव ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

विनय रामचंद्र खडके (वय ५४,रा.सोपानदेव नगर, जळगाव ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, विनय खडके हे पारोळा रूग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला होत. त्यामुळे ते दररोज त्यांची दुचाकी (एमएच १९ यु ७३०३) ने दररोज अपडाऊन करत होते. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजेच्या सुमारास ड्यूटी संपल्यानंतर पारोळाहून घरी येत असतांना अजिंठा चौकात रोटरी सर्कलजवळ नेरी नाक्याकडून जामनेर जाणाऱ्या बेदमुथा ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यात रस्त्यावर फेकले केले. त्यात त्यांच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरु असताना सहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी रोहिणी, मुलगा अतिष  असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content