जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे पहिला सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न !

जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील तायडे परिवाराने अनिष्ट रूढींना फाटा देत सत्यशोधक जयेश व सत्यशोधकी पूनम हिचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला असून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.

 

टाकळी बुद्रुक येथील निवृत्ती तायडे यांनी आपल्या नातीचे लग्न माळी समाजाच्या पद्धतीने करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने सरपंच सारंगधर अहिरे, उपसरपंच बाळू चौरे व तायडे परिवाराने पुढाकार घेऊन माळी समाजाच्या पद्धतीने लग्न लावायचे ठरवले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन तालुक्यातील पहिले सत्यशोधक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. यामध्ये चिरंजीव जयेश, वधु पूनम यांचा विवाह थाटात पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांचा हा सत्यशोधक विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. या विवाह सोहळ्याची एकच चर्चा असून अशाच पद्धतीने सर्वांनी लग्न लावले पाहिजे असे बोलले जात आहे. या लग्न समारंभाला डॉ. प्रशांत पाटील, रमेश वराडे, सारंगधर अहिरे, बाळू चवरे, रमेश चवरे, समाधान वराडे, भगवान रोकडे, राजू माळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content