बिग बी रूग्णालयात दाखल

amitabh bachchan twitter 650x400 71522952430

मुंबई प्रतिनिधी । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्यानं गेल्या तीन दिवसांपासून ते नानावटी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा यकृताचा त्रास वाढला असल्याने त्यांना मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच स्वतःच्या प्रकृतीबाबत माहिती देताना माझं यकृत 75 टक्के खराब झालं असून केवळ 25 टक्केच यकृत काम करत असल्याचं सांगितलं होतं. 1982 मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या दुखापतीपासून त्यांना यकृताचा त्रास सुरू आहे. बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री २ वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना रूग्णालयात दाखल करून ३ दिवस झाले आहेत. प्रसिद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे त्यांच्यावर उपचार करत आहेत. १९८२ साली “कुली” चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या यकृताला दुखापत झाली होती. ११ ऑक्टोबर रोजी ‘बिग बीं’नी ७७ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तसंच गेल्या महिन्यात त्यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सात हिंदुस्तानी या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती.

Protected Content