मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.
आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याआधी विधीमंडळाच्या पायर्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यात स्थगिती सरकार हाय-हाय आदींसह अन्य घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यात अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार सहभागी झाले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे सरकार हे गद्दार सरकार असल्याची टीका याप्रसंगी आंदोलक आमदारांनी केली. त्यांच्या सरकारने मविआ शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिल्याचा मुद्दा देखील याप्रसंगी प्रामुख्याने नमूद करण्यात आला. याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टिका केली.