मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवारांना शिवसेना संपवायची होती असा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा आरोप निव्वळ हास्यास्पद असल्याचा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
काल माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांनी टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगतले की, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यातून आज शिवसेनेत उभी फूट पडली आहे. हा सर्व प्लॅन शरद पवार यांचा होता. त्यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यास भाग पाडून शिवसेनेला पध्दतशीरपणे संपविले. यात संजय राऊत यांनी सुपारी घेऊन शिवसेनेला आजच्या स्थितीत नेल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
यानंतर माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे यांनी आमदार गिरीश महाजन यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे गद्दारांमुळे पडले आहे. मुख्यमंत्र्यांवर सर्जरी झाली असतांना याचा फुटीरांनी गैरफायदा घेतला. जर तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून दाखवा असे प्रतिआव्हान देखील त्यांनी दिले.