Home Cities जामनेर माजी सभापती प्रदीप लोढा यांचा भाजपात प्रवेश

माजी सभापती प्रदीप लोढा यांचा भाजपात प्रवेश

0
105


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील माजी जिल्हा परिषद सभापती प्रदीप लोढा यांच्यासह, माजी जि.प. सदस्य कैलास पाटील, शेंदुर्णी जीन प्रेसचे माजी चेअरमन श्याम सावळे, शरद पांढरे ,भागवत पाटील गोंदेगाव आदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव येथे आज गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी त्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री प्रदीप लोढा यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपामध्ये प्रवेश केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रदीद लोढा यांच्या प्रवेशाने पहूरच्या राजकीय वर्तुळात भाजपचे पारडे जड झाले आहे .


Protected Content

Play sound