महिलेचा पाठलाग करून केला विनयभंग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील भवानी माता देवी यात्रेत एका महिलेचा पाठलाग करून तिची साडी ओढून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे २२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. साकेगावात राहणारा साहील राजू पटेल वय २५ हा महिलेचा गेल्या १५ दिवसांपासून पाठलाग करून तिचा मोबाईल नंबर मागत होता. दरम्यान, मंगळवारी २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता साकेगावात यात्रा होती. या यात्रोत महिला ही पायी जात असतांना साहिल पटेल याने पुन्हा पाठलाग केला. त्यानंतर तिचा साडीचा पदर पकडून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी साहील राजू पटेल याच्या विरोधात बुधवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा संजिवनी हे करीत आहे.

Protected Content