एकमेकांवर आरोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं – आ. एकनाथराव खडसे  

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच हिवाळी अधिवेशन संपलं, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.

गेल्या आठवड्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान या अधिवेशनात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडले होते. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोदार हल्लाबोल केला. हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसें यांनी अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच फक्त वेळ गेल्याचे सांगितले. हिवाळी अधिवेशनावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान हिवाळी अधिवेशन विदर्भात असतांना विदर्भातील प्रश्नांना न्याय नाही असा देखील थेट आरोप खडसे यांनी केला. आ. एकनाथराव खडसे यांनी गेल्या काही दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला बोल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कापसाला योग्य भाव नाही, दोन ते तीन हजार अनुदान या सरकारने मदत म्हणून दिली असती तर न्याय मिळाला असता असं खडसे यांनी म्हंटले आहे. दोन्ही पक्षाच्या एकानेही कापसाचा हा प्रश्न लावून धरला असता तर सरकार झुकलं असतं, अधिवेशनात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या कोणत्याच प्रश्नाला या ठिकाणी विचारले गेले नाही, गंभीर प्रश्न बाबत सरकार हे असंवेदनशील आहे असा आरोप खडसे यांनी केला आहे. सातत्याने फक्त एकच प्रश्न समृद्धी महामार्ग, मात्र ग्रामीण भागातल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे दुर्लक्ष असल्यााचे देखील त्यांनी स्पष्ट केले. शिवाय कापूस उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. १४ हजाराहून ६ हजारावर कापसाचा भाव गेला आहे. यावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Protected Content