अडावद येथील शिक्षक-शिक्षकेतर पदांच्या भरतीला स्थगिती

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद येथील सार्वजनीक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरती प्रक्रियेला अखेर शिक्षण उपसंचालकांनी स्थगिती दिली आहे.

अडावद येथील सार्वजनीक विद्यालयातील बोगस भरती प्रकरण खूप गाजत आहे. यात संस्थाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती केल्याप्रकरणी, येथील सार्वजनिक विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक व विद्यमान मुख्यध्यापकांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याबाबत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित होता. या अनुषंगाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाच शिक्षक व तीन शिक्षकेतर कर्मचारी भरतीला स्थगिती देण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढले.

शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणास स्थगिती देण्याचे आदेश काढले. त्यानुसार उपशिक्षक सचिन सुभाष पाटील, उपशिक्षिका नंदिनी रविंद्र पाटील, सपना बळीराम कोळी, शारदा वसंत बाविस्कर, स्नेहल रामकृष्ण पाटील, कनिष्ठ लिपिक राजेश सुरेश बाविस्कर, शिपाई शुभम अरूण महाजन, ऋषिकेश प्रकाश देशमुख यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊ नये, असे आदेश काढले आहेत.

Protected Content