नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एनएसडीने ट्वीट करत माहिती दिली की, “आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रख्यात अभिनेते आणि पद्मश्री परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कुटुंब त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल.”
संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करत म्हटलं की,, “प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. त्यांच्या सक्षम नेतृत्वात एनएसडी नक्कीच नवीन उंचावर जाईल.” एनएसडी अध्यक्षपदी नियुक्तीनंतर अभिनेते परेश रावल यांनी म्हटलं की, हे काम आव्हानात्मक पण मजेदार असेल. पुढील चार वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.