माजी सरपंचांसह कार्यकर्ते शरद पवार गटात दाखल

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोचूर खुर्द येथील माजी सरपंच तसेच त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे.

कोचुर खुर्द येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश विधानपरिषद सदस्य माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश नुकताच पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच मतदार संघाचा विकास करू शकतो, या भावनेतून रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द येथील माजी सरपंच तुषार परदेशी, मुरलीधर परदेशी, गौरव चौधरी, इमरान शेख, शरद तायडे आदी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षचिन्हाचा रुमाल गळ्यात टाकून सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, माजी नगरसेवक डॉ प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत तायडे, गणेश महाजन, ललित महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Protected Content