अधिकृत निकालाआधीच मुक्ताईनगरात खडसे समर्थकांचा जल्लोष !

मुक्ताईनगर, पंकज कपले | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून यासाठी मतदान झाले आहे. काही तासांमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तथापि, याआधीच मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. शहरात निकाल लागण्याआधीच नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत.

एकनाथराव खडसे यांचे समर्थक हे कालपासूनच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. तर काही जण आज सकाळी मुंबईत पोहचले. खडसेंचे निवासस्थान आणि विधानभवन परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. या समर्थकांना एकनाथराव खडसे यांचा विजय निश्‍चित वाटत आहे. तर हेच चित्र मुक्ताईनगरातही दिसून आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: