कारवाई : चोरीच्या तीन दुचाकींसह तिन जणांना अटक; चाळीसगाव पथकाची कारवाई

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील घाट रोडवरील विठ्ठल मंदीरासमोरून एका तरूणाची ७० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना शनिवारी १५ जून रोजी दुपारी १२.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १६ जून रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.

नानासाहेब सुदाम आहेर वय २९ रा. नांदगाव ता. जि.नाशिक हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १५ जून रोजी दुपारी १२.३० वाजता नानासाहेब हा त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच ४१ बीजी ६९४१) ने चाळीसगाव शहरातील विठ्ठल मंदीराजवळ कामाच्या निमित्ताने आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी ही मंदीरासमोर पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर त्याने रविवारी १६ जून रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनिल रघुनाथ मेघाळे वय २२, तुळशीराम मच्छिद्र जाधव वय १९ आणि कचरू शिवा मिंघाळ सर्व रा. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चोरीच्या एकुण ३ दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राहूल सोनवणे हे करीत आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिह देशमुख यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोउपनिरी सुहास आव्हाड, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ मनोज चव्हाण, पोक राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

Protected Content