लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी बसस्थानकजवळ लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणावर पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ही कारवाई केली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश प्रकाश सपकाळे वय २१ रा. हरीओमा नगर, जळगाव असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

\पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावाच्या बसस्थानक परिसरात संशयित आरोपी कमलेश सपकाळे हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी ११ मार्च रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कमलेश सपकाळे याच्या विरोधात रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.

Protected Content