चवदार सोलकढी (व्हिडीओ)

866fa8f8 093f 47a0 9b44 339aa4eb2653

जळगाव (प्रतिनिधी) आज ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ पुन्हा आपल्यासाठी एका नव्या रेसिपीची माहिती घेवून आले आहे. ते म्हणजे ‘सोलकढी’ नावाचे मालवणी सरबत. सोलकढी ही एक विशेष चवदार आणि पाचक पाककृती आहे. कोकम (मँगोस्टीन) वनस्पतीच्या फळापासून ही सोलकढी किंवा पाचन कढी बनते.

 

गोव्यापासून ते महाराष्ट्रातील कोकण भागातील जेवणात कोकमला एक विशिष्ट स्थान आहे. कोकमचे फळ हे कोकणच्या भूमीत मोठ्या प्रमाणात पिकते. त्यामुळेच या भागातील अनेक पदार्थांमध्ये ते खमंग किंवा खारट करणारे एजंट म्हणून वापरले जाते. कोकणी लोक सोलकढीत कोकमसह नारळाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अस्सल मालवणी लोकांचे जेवण तांदूळाच्या वापराशिवाय पूर्ण होत नाही, या जेवणाच्या शेवटी पाचक पदार्थ म्हणून सोलकढीचे सेवन केल जाते.
सहसा सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्याली जाते किंवा शेवटच्या भातावर घेतली जाते, अशी तिथली पारंपारिक पध्दत आहे. कोकणात जवळपास सर्वच घरात सोलकढी दुपारच्या जेवणात शेवटी हजेरी लावीत असते. गोव्यात सोलकढी ‘सांगचो रॉस’ आणि ‘स्टीमड राइस’च्या पानावर सर्व्ह केली जाते. अशी ही
चवदार सोलकढी कशी बनवली जाते…यासाठी आपल्याला शेफ हर्षाली चौधरी आणि प्रतिमा पाटील या मार्गदर्शन करणार आहेत…सोलकढी साठी लागणारे साहित्य असे आहे…आमसूल, काळमीठ, हिरवी मिरची, जिरेपुड, कोकोनट मिल्क, शूगर सीरप, आणि सजावटीसाठी पुदिना. अशाचप्रकारे नियमितपणे नवनवीन पाककृतींबद्दल माहिती घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ पोर्टलच्या सतत संपर्कात राहा.

 

Add Comment

Protected Content