जी.डी. बेंडाळे यांची पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

bendale Press

जळगाव प्रतिनिधी । अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान जळगाव व खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभाग आयोजित आनंदयात्री अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. विलास चव्हाण (माजी संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, व एम.डी. पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे) यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय “भगवान गौतम बुद्ध यांचा विज्ञाननिष्ठ धम्म”असा आहे.

कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५ वाजता असून कार्यक्रमाचे ठिकाण जुना कॉन्फरन्स हॉल, मुळजी जेठा महाविद्यालय येथे केलेली आहे. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.किसन पाटील, कोषाध्यक्ष शशिकांत वडोदकर, सचिव डॉ. अशोक राणे, डॉ. रजनी सिन्हा (संचालक, वैश्विक मानवी मूल्ये प्रशाळा), विजय कंची, प्रणिता झांबरे आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content