नाथाभाऊंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कार्यालय सज्ज (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे जळगाव राष्ट्रवादीमध्ये उत्सवाचं वातावरण तयार झाले आहे. पक्षप्रवेशानंतर एकनाथराव खडसे मुंबई येथून जळगाव येथे येण्यास निघाले आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी राष्ट्रीवादीच्या जिल्हा कार्यलयात करण्यात येत आहे.

जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्वागतासाठी रांगोळी, पणती व फुलांचे हार लावून सजविण्यात आले आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच नाथाभाऊ यांच्या स्वागतासाठी महिलांनी फुलहार लावण्यापासून ते रांगोळ्या काढण्यापर्यंत जोरदार तयारी करत आहेत. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्याने आजच दसरा -दिवाळी सण असल्याचा आनंद राष्ट्रवादीतर्फे साजरा येत आहे.दरम्यान, महिला पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच पक्ष कार्यलयाची झेंडूची फुलांची माळ लावणे , रांगोळी काढणे, पणती लावणे यासारख्या कामांत दंग झाल्या होत्या. या तयारीबाबत महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांनी सांगितले की, ४० वर्ष पक्ष वाढविण्यासाठी संघर्ष करणारे संघर्ष यात्री नाथाभाऊ यांचे पक्षात येण्याने मोठा आनंददायी वातावरण तयार झाले आहे. उद्या दसरा आहे सीमोलंघन करायचे आहे ते आजच केले आहे.

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली मीनाक्षी चव्हाण, जयश्री पाटील, आशा अंभोर, डॉ. सुषमा चौधरी, दिव्या भोसले, कमलाबाई सोनवणे, ममता तडवी, राहिसा बी पटेल, शकुंतला धर्माधिकारी, अर्चना कदम, वाय. एस. महाजन, सलीम इनामदार, सतीश चौहान, कौशर काकर आदी उपस्थित होते.

भाग १

भाग २

Protected Content