कोरोनाच्या आपत्तीमधील रूग्णसेवेबद्दल डॉ. केतकी पाटील यांचा गौरव ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांना नाशिक येथील समृध्दी बहुउद्देश्यीय सामाजिक संस्थेतर्फे महिला गौरव पुरस्कार-२०२० जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या आपत्तीत केलेल्या सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

व्हिडीओसह सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी नाशिक येथील समृध्दी बहुउद्देश्यीय सामाजिक संस्थेतर्फे महिला गौरव पुरस्कार-२०२० नुकताच प्रदान करण्यात आला. या संदर्भात डॉ. केतकी पाटील म्हणाल्या की, कोरोनाच्या आपत्तीत आमच्या हॉस्पीटलमध्ये अतिशय उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली असून आता या पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याचा आनंद वाटत आहे.

डॉ. केतकी पाटील पुढे म्हणाल्या की, एप्रिलपासून कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर आम्ही लागलीच उपचार सुरू केले. अर्थात, दुसरीकडेही उपचार असले तरी कोरोनाच्या रूग्णांसोबत कुणी सुसंवाद करण्यासाठी धजावत नव्हते. आम्ही मात्र आलेल्या प्रत्येक रूग्णाला आस्थेवाईकपणे बोलून, त्याच्याशी संवाद साधून त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला. यासाठी माझ्या एकटीचे नव्हे तर आम्हा सर्व सहकार्‍यांचे याच अगदी डॉक्टर्सपासून ते नर्सिंग, वॉर्ड बॉय, प्रशासकीय यंत्रणा आणि अगदी स्वीपर्स पर्यंतच्या सर्वांचे सहकार्य लाभले. याचमुळे आम्ही कोरोनासारख्या अतिशय कठीण कालखंडातही रूग्णांची सेवा करू शकलो. यामुळेच हा पुरस्कार आमच्या सर्व सहकार्‍यांना समर्पित असल्याचे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी केले.

खालील व्हिडीओत पहा डॉ. केतकी पाटील यांनी पुरस्काराबद्दल व्यक्त केलेले मनोगत.

Protected Content