यावल, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले असुन या काळात यावल येथे विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरु ठेवल्याने प्रशासनाने तात्काळ सकाळच्या सुमारास दोन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात नगर परिषदच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक २१ मे शनिवार रोजी शहरातील भुसावळ पॉईंट परिसरातील यावल खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील सदगुरू आणी यश एजन्सीज मोबाइल दुकानावर प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन, या कार्यवाहीत यावल नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद स्वच्छता अधिकारी शिवानंद कानडे, पोलीस अमलदार सलीम शेख, ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी, नगर परिषदचे रवी काटकर, स्वनील म्हस्के, संदीप पारधे, विश्वनाथ गजरे, नितिन पारधे यांच्यासह आदीनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.