वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ‘अ’ श्रेणीची अट रद्द होणार

shishak baithak

यावल प्रतिनिधी । राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी शाळा सिद्धी मध्ये ‘अ’ श्रेणीची अट रद्द केली जाणार असल्याचे वृत प्राप्त झाले आहे. या बाबत राज्याचे शिक्षण मंत्री ना.आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहीती शिक्षण सह संचालक दिनकर टेमकर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती च्या बैठकीत दिली.

या वेळी शिक्षण उप संचालक अत्तार, शालेय पोषण आहार योजना चे प्रमुख वाघमोडे, समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अर्जुन साळवे, सरचिटणीस अर्जुन कोळी सर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष इल्हाजोदिन फारुकी, राज्य समन्वयक किशोर पाटील यांच्या सह राज्यातील ३६ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान राज्यातील शाळांना कमर्शिअल वीज बिल ऐवजी घरगुती वापराने वीज बिल भरुन घेणे बाबत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळास पत्र देण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले. याच बरोबर सुटीच्या कालावधीत शालय पोषण आहाराची जबाबदारी पार पाडणार्‍या शिक्षकांना अतिरिक्त रजा द्यावी, शालेय पोषण आहार नोंदी चा कालावधी पाच दिवसांचा करावा या शिवाय अनेक विषयांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. सह संचालक यांनी त्या अनुषंगाने लवकरच संचालक स्तरावर व शासन स्तरावर चा पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

याप्रसंगी झालेल्या चर्चेत विविध शैक्षणिक बाबीवर विचार मांडताना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे संस्थापक अध्यक्ष इल्हाजुद्दिन फारुकी, समन्वय समितिचे अध्यक्ष अर्जुन साळवे, सरचिटणीस अर्जुन कोळी सर, कार्याध्यक्ष व प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर, अरूण जाधव, मुबारक जमादार, मुकेश शिपले, म्हसदे आदींसह सदस्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

Protected Content