म्युकरमायकोसिसच्या औषधाची उपलब्धता आणि पुरवठा वाढवला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातल्या म्युकरमायकोसिस  उपचारासाठी  Amphotericin B या औषधाच्या उपलब्धतेबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून  माहिती देण्यात आली आहे. या औषधाचा पुरवठा वाढवण्यात येणार असल्याचंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

 

सध्या देशामध्ये Amphotericin-B या औषधाचा तुटवडा आहे. पण आता त्याची उपलब्धता आणि पुरवठा वाढवण्यात आल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. तर ५ अतिरिक्त उत्पादकांना या औषधाच्या निर्मितीसाठीचा परवाना देण्यासाठी औषध मंत्रालय आरोग्य मंत्रालयाशी समन्वय साधत असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

 

 

 

देशात सध्या म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीच्या संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याच्यावर उपचारासाठीच्या औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. याच मुद्द्यावर विरोधकही आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित या औषधाची उपलब्धता तात्काळ वाढवावी अशी मागणीही केली आहे.

 

या पत्रात त्यांनी ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या औषध तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला जावा. तसेच, त्यांनी Liposomal Amphotericin-B च्या तुटवड्यावरून कारवाईची मागणी करत, अन्य आरोग्य विम्यांमध्ये म्युकरमायकोसिसला कवर करण्याची देखील विनंती केली आहे.

 

सोनिया गांधींनी म्हटले आहे की, “भारत सरकारने केवळ राज्यांना म्यूकरमायकोसिसला महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करणयास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, याच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. याचबरोबर उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल.”

 

Protected Content