वढोदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप सोनवणे

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वढोदे प्र यावल ग्राम पंचायतच्या सरपंचपदी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते संदीप सोनवणे तर उपसरपंचपदी गोपाळ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

दरम्यान सरपंच व उपसरपंचपदाची निवड जाहीर होताच पक्षाच्या समर्थकांनी एकच जल्लोश केला. वढोदे प्र यावल येथील ग्राम पंचायतच्या कार्यालयात आज १७ फेब्रुवारी रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे अभीयंता आर .पी . इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सरपंच निवडीच्या सभेस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सरपंचपदाकरीता काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे चिरंजिव आणी पक्षाचे युवा कार्यकर्ते संदीप प्रभाकर सोनवणे यांची तर उपसरपंचपदी पक्षाचे गोपाळ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच आणी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, काँग्रेस कमेटीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश जावळे, ग्रामीण कॉग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल, कोरपावलीचे नवनियुक्त सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच मुक्तार पटेल, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श ग्रामसेवक मजीत तडवी, समाधान सोनवणे यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले. या प्रसंगी मोठ्या संख्ये ग्रामस्थ मंडळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content