जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये गांजाचे सेवन करून नशा करण्यात एकावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरामध्ये अन्वर खान हनीफ खान वय 42 हा तरुण चिलम मध्ये गांजा भरून त्याचा नशा करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी 11 मे रोजी कारवाई केली. त्याच्याकडून नशा करण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी रात्री 9 वाजता पोलीस कॉन्स्टेबल हरीलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करीत आहे.