शेवगे बुद्रुकला जुगार अड्ड्यावर छापा; तीन लाखांचा ऐवज जप्त

jugar

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांना धाड टाकून तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे की, शेवगे बुद्रुक शिवारात गेल्या तीन-चार महिन्यांपासून पत्ता जुगाराचा अड्डा हा नियमित सुरू होता. त्या अड्ड्यावर पोलीस निरीक्षक व सह्ययक पोलीस निरीक्षक या अधिकार्‍यांनी छापा टाकला. त्यात घटनास्थळी रोख रक्कम सह तीन लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आला आहे. आधिकार्‍यांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या भागातील व इतर विशेष पोलीस कारवाई कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. हे विशेष दरम्यान या अवैध धंदेकडे दुर्लक्ष करणारे व पाठीशी घालणारे त्या कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे तालुक्यात लक्ष लागून राहिले आहे.

शेवगे शिवारातील टेकडी जवळ झन्न मन्ना नावाचा पत्ता जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार रवींद्र रावते यांना सोबत घेत घटनास्थळी छापा टाकला. जुगार्‍यांना याची चाहूल लागताच दहा ते बारा जुगारी हे फरार होण्यास यशस्वी झाले. मात्र अशोक हिरामण चौधरी वय ५० आझाद चौक पारोळा व जगन्नाथ पांडुरंग चौधरी वय ५५ झपाट भवानी चौक पारोळा व विलास नामदेव चौधरी वय३८जडे गल्ली पारोळा हे रंगेहात मिळून आले. पळून जाणार्‍यांची इतर साथीदारांची पोलिसांनी नावे विचारली असता त्यात राजीव ओंकार भोई, दशरथ शिवलाल भोई, ज्ञानेश्‍वर साहेबराव भोई, सतीश भगवान भोई, अनिल रामदास चौधरी सर्व राहणार पारोळा अशी नावे समोर आली आहेत. उर्वरित चार ते पाच जणची नावे समजली नाहीत.

दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी १९,६६० रुपये रोख व दोन लाख ८५ हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली व पत्ता जुगाराचे साहित्य आसा एकूण ३,०४६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस नरेंद्र गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून सर्व संशयित आरोपींविरुद्ध पत्ता जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी वरील तीन आरोपी हे ताब्यात असून उर्वरित हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, इतर सुरू असणार्‍या अवैध धंद्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.

Protected Content