फैजपुर सह परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणारे हातभट्टी दारू,देशी दारू,सट्टा बेटिंग वर ए.पी.आय. प्रकाश वानखडे यांनी रूजू झाल्याबरोबर धडक कारवाई केल्याने नंबर दोनवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

प्रकाश वानखेडे हे फैजपुर पोलीस स्टेशनला रूजू होताच त्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बामणोद, पाडळसे, चिखली, विरोदा, फैजपूर, न्हावी, कासवा येथे धाडी टाकल्या. यात देशी दारूच्या बाटल्या, हातभट्टीची दारू, रसायन जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यात अवैध दारू विक्री करणारे पंकज दिलीप जावळे बामणोद याच्या कब्जेतून देशी दारू बाटल्या; संजय मोहन कोळी कासवा पाच हजार रुपये किमतीची रसायन हातभट्टी दारू; सय्यद युसूफ सय्यद बाबू पाडळसे याच्या कब्ज्यातून १० हजार ४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, पांडुरंग शामराव कोळी पाडळसे याच्याकडून १००० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या; संतोष अमृत सोनवणे चिखली याच्याकडून ५० रुपयांची गावठी दारू; विनोद रंगनाथ कोळी न्हावी याच्या कडून ५२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या; भगवान उखर्डू कोळी विरोदा याच्या कब्जेतून १ हजार ४० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, पंकज पांडुरंग नेमाडे विरोदा याच्या कब्जेतून ४८० रुपयांची हातभट्टीची दारू; रमेश सेनफडू पाटील चिखली याच्या कब्जेतून १००० किंमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.

यासह सट्टा बेटिंग घेणारे फैजपूर, बामणोद अशा ३ जणांवर कारवाई करून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोटरवाहन कायद्याप्रमाणे ३८ जणांवर केसेस करण्यात आले आहे. संबंधीत केसेस करून सुमारे दहा हजाराच्या वर दंडवसूल करून कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई हेड कॉन्स्टेबल विनोद बाउस्कर, पो.कॉ बाळू भोई यांनी केली आहे. ही कारवाई ए.पी.आय. प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय जिजाबराव पाटील सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.कॉ .महेश वंजारी, उमेश सानप, उमेश चौधरी, किरण चाटे, महेंद्र महाजन यांनी केली आहे. यामुळे अवैध धंदेवाले धास्तावले आहेत.

Protected Content