भरत बाविस्कर यांचे चोपडा सूतगिरणीचे संचालक पद रद्द

bharat baviskar chopda चोपडा प्रतिनिधी। येथील तात्कालीन चोपडा शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक भरत विठ्ठल बाविस्कर ( रा.वडगाव सिम) यांचे संचालक पद वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या आयुक्त तथा अतिरिक्त निबंधक डॅा.माधवी खोडे चवरे यांनी रद्द ठरविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,येथील तात्कालीन चोपडा तालुका शेतकरी व सध्याची तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक मंडळातील अनुसूचीत जमातीसाठीच्या राखीव पदावर भरत विठ्ठल बाविस्कर रा.वडगावसिम ता.चोपडा हे २०१५ साली बिनविरोध निवडून आले होते. तथापि त्यानंतर बाविस्कर यांनी गोरगावले पंचायत समिती गणातून इतर मागासवर्ग राखीव पद आरक्षीत जागेसाठी निवडणूक लढवून आपल्याकडे असलेल्या अनुसूचीत जमाती व इतर मागास वर्ग साठीच्या जात प्रमाणपत्रांचा आधार घेत दोन वेगवेगळ्या संस्थात दोन वेगवेगळ्या आरक्षणाचा लाभ घेवून शासनाची फसवणूक केली अशी तक्रार करीत तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीतील त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी अशोक दौलत पाटील रा.वाळकी यांनी वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांच्याकडे केली होती.
त्यानुसार वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दि.२२ जुलै रोजी निकाल देवून भरत बाविस्कर यांच्यावर दोन संस्थात वेगवेगळ्या आरक्षणावर निवडणूक लढवत विजयी होवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली असल्याचा ठपका ठेवत त्यांचे सूतगिरणीतील संचालक पद रद्द केले आहे.तसेच त्यांनी निवडणूक वेळी सादर केलेले जात प्रमाणपत्र पुढील कार्यवाहीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठविल्याचे सुचित केले आहे.

दरम्यान, सूतगिरणीचे संचालक भरत बाविस्कर यांनी दोन वेगवेगळ्या निवडणुकात एकाच व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या जाती व प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असल्याचे सिध्द झाल्याने बाविस्कर यांच्या विरूद्ध शासनाचे संबंधित विभाग शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. त्यामुळे बाविस्कर यांचे गोरगावले गणातील पंचायत समिती सदस्य पदाचे भवितव्य देखील अंधारमय झाल्याची तालुक्यात चर्चा आहे.

Protected Content