दारू भट्ट्यावर यावल वनविभागाची कारवाई; दोन लाखाची दारू जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून यावल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र पाडले कक्ष क्र. १ आणि २ मध्ये गंगापुरी धरण परिसरात वन विभागाने केलेल्या धडक कारवाई करत राखीव वनातून ५अवैध गावठी दारू भट्ट्यां नष्ट केल्या.

सदर कार्यवाहीत १) भट्टी क्र. १- मोठे बॅरल १ ,छोटे बॅरल -३८ यात रक्कम -२६९५० येवढ्या किमतीची अंदाजे ७७० लीटर व भट्टी तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य अंदाजे -5000 2) भट्टी क्र.2-मोठे बॅरल 1,छोटे बॅरल -45 याची किंमत -३०६२५ येवढ्या किमतीची अंदाजे ८७५ लीटर दारू तसेच होंडा कंपनी ची एमपी १२ एमए MA ७५८३ नंबरची मोटार सायकल अंदाजे किंमत २९००० तसेच तयार गावठी दारू ३९ ली. त्याची किंमत ३९०० दारुभट्टी साठी लागणारे इतर साहित्य किंमत७००० रूपये. 3) भट्टी क्र. ३- मोठे बॅरल१,छोटे बॅरल -३० याठिकाणी एकूण २२७५o किमतीची अंदाजे ६५० ली.दारु तसेच भट्टी साठी लागणारे इतर साहित्य =6500 4) भट्टी क्र. ४ मोठे बॅरल १,छोटे बॅरल ४२ ,या ठिकाणी एकूण कच्छी दारू२४९०० रुपयाची अंदाजे ८५० 830 ली. वा इतर साहित्य ३७०० रूपये किमतीचे तर ५) भट्टी क्र.५- मोठे बॅरल ३, छोटे बॅरल ५० याठिकाणी एकूण कच्ची दारू किंमत४७२५० रुपयाची १०५० 1050 ली.दारू व भट्टी साठी लागणारे इतर साहित्य किमत८००० रूपये एकूण ५ भट्टयांवर कच्च्या दारूचे रसायन अंदाजे ४४७५लीटर किंमत १५६६२५ रूपये किमतीच्या गावठी तयार दारु ३९लीटर. किंमत ३९०० भट्टी साठी लागणारे इतर साहित्य इतर साहित्य किमत अंदाजे ३०२०० व जप्त मोटार सायकल यांची ऐकून अंदाजे रक्कम २९००० हजार एकुण जप्त व नष्ट केलेल्या मालाची ऐकुन रक्कम २ लाख १९ हजार७२५ रूपये नाशवंत मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. वनरक्षक पाडले खुर्द यांचेकडील प्रं.रि. क्र. ०६/२०२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास वणपाल(आहिरवाडी ) करीत आहेत.

सदरील कारवाई ही मा.वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त निनु सोमराज,उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील सर, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यवाही वनक्षेत्रपाल रावेर, अजय बावणे सर, वनरक्षक,सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, सविता वाघ,आयेशा पिंजारी, मंगला बारेला, संगीता बारेला ,कियारसिंग बारेला ,आकाश बारेला,निलेश बारेला थावऱ्या बारेला ,वाहन चालक विनोद पाटील ,वनमजूर युनूस तडवी यांनी सदरची कार्यवाही केली.

Protected Content