आव्हाणे येथे सट्टा जुगार खेळणार्‍या दोन जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाने येथे सट्टा जुगार अड्ड्यांवर तालुका पोलिसांनी छापा टाकला असून यात दोन जणांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत  कृष्णा सोनवणे व कैलास मंगल  सपकाळे  या दोन जणांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय दुसाने दीपक कोळी उमेश ठाकूर दिनेश पाटील महेंद्र सोनवणे श्याम पाटील  विश्वनाथ गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Protected Content