भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला उडविले

 

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल-म्हसावद दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सुरसिंग पाटील (वय 50) रा. पाथरी ता. जि.जळगाव हे रविवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांची मोटरसायकल क्रमांक (एम एच १९, सीई ४९४२)ने म्हसावदकडून एरंडोलकडे जात होते. त्यावेळी समोरून एरंडोलकडून म्हसावद कडे जाणाऱ्या आयशर क्रमांक (एमएच १९ झेड ५१९६) ने भरधाव वेगाने येवून दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात मयताचे शालक समाधान महादू पाटील (वय-३८) रा. जवखेडा खुर्द ता. एरंडोल यांच्या फिर्यादीवरून आयशर ट्रक वरील चालक नईमुद्दीन कयामुद्दीन शेख रा. मुल्ला वाडा, एरंडोल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content