मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असताना मुंबईतही महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईतील सायन हॉस्पिटमध्ये महिला डॉक्टरवर पेशंट्सच्या नातेवाईकांनी हल्ला केला. यावेळी महिला डॉक्टर स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाली. रविवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणात बीएमसी एमएआरडी असोसिएशनच्या डॉक्टरांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सायन हॉस्पिटलमध्ये रविवार म्हणजे 18 ऑगस्टर रोजी ही महिला डॉक्टर वॉर्डमध्ये ड्यूटी करत असताना हा प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरवर हल्ला करणारे सर्वजण नशेत होते. आरोपींनी महिला डॉक्टरला धमकी देखील दिली. या घटनेनंतर पेशंट आणि त्याचे नातेवाईक फरार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.