Home क्राईम भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर चाकूहल्ला

भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर चाकूहल्ला

0
68


Crime l 2
 

जळगाव (प्रतिनिधी) भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी आज सकाळी (मंगळवार) तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मी कोटेक्स् जिनिंग मीलजवळच्या अनिल पावरा या तरुणावर सोमवारी रात्री ८.३० वाजता चाकुहल्ला झाला होता. या प्रकरणी मंगळवारी तालुका पोलिस ठाण्यात सुभाष धनगर व गोविंद धनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावरा कुटंुबियांचे भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर धनगर याने त्यांच्यावर चाकुने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound