भरधाव पॅजोरिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव पॅजोरिक्षाची जोरदार धडक दिल्याने चिखली येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका  पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील चिखली येथील लिलाधर डिगंबर सोनवणे (वय-२८) हा तरुण (एमएच १९ डीयू २७५१) क्रमांकाच्या दुचाकीने सोमवारी ६ जून रोजी सकाळी आला जळगाव शहरात आला होता. काम अटोपून चिखली येथे जाण्यासाठी असोद्याकडून भादलीकडे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच १९ बीएम ५०६०) पॅजोरिक्षाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडून त्याच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान धडक देवून रिक्षाचालक घटनास्थळहून रिक्षा घेवून पसार झाला. जखमी झालेल्या लिलाधर सोनवणे याला तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री ८ वाजता लिलाधर सोनवणे याच्या तक्रारीवरुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सुधाकर शिंदे हे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!