ॲक्सीडेंट : निलगायच्या धडकेत रिक्षा पलटी; एक ठार, चार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या रिक्षाला दुरदर्शन टॉवरजवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या निलगायने जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी होवून एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

साबीर सत्तार बागवान (वय-४०) रा. जाम मोहल्ला, भुसावळ असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, “भुसावळकडून जळगावकडे येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ९५२१) येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून निलगाय रस्ता क्रॉस करत असतांना रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी झाली यात रिक्षात बसलेला शाबीर सत्तार बागवान याला डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालक मोहम्मद आलम मोहम्मद जान (वय-४८) रा. भुसावळ, बबता कन्हैय्याल बडगुजर (वय-४५) रा. पिंपळगाव ता. एरंडोल, नसरीनबी चांद बागवान (वय-५५) रा. धुळे आणि साहिल मकबल बागवान (वय-१३) रा. तांबापूरा हे चौघं गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्यानंतर चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.” अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: