लाच स्वीकारतांना आगार व्यवस्थापक अटकेत

जळगाव प्रतिनिधी । विभागीय चौकशीच्या अनुकुलतेसाठी लाच स्वीकारतांना भुसावळ येथील आगार व्यवस्थापकांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एस.टी. महामंडळातील एका ४९ वर्षीय कर्मचार्‍याविरूध्द विभागीय चौकशी सुरू आहे. यात अनुकुल शेरा मारण्यासाठी भुसावळ येथील आगार व्यवस्थापक हरीष मुरलीधर भोई यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केली होती. यामुळे संबंधीत कर्मचार्‍यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

या अनुषंगाने पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक गणेश कदम, स.फौ.रविंद्र माळी, पो.ना.मनोज जोशी,सुनिल पाटील, जनार्दन चौधरी,पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर यांनी पथक तयार करून सापळा रचला. यानुसार हरीष भोई यांना एक हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे. हरीश मुरलीधर भोई, (वय-३०, व्यवसाय-नोकरी,आगार व्यवस्थापक, राज्य परीवहन मंडळ, भुसावळ डेपो.रा.१५ बंगला परीसर, एस.टी.डेपो,भुसावळ ) यांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Add Comment

Protected Content