जंगलात नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लाकूड वेचण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी १४ वर्षीय मुलगी ही तिच्या आईसह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता १४ वर्षीय पीडित मुलगी ही घरी असताना संशयित आरोपी नन्ना नजाकत खान रा. जामनेर हा आला. बोदवड रोडवरील बहिरे बुवा जंगलात लाकूड वेचण्याचा बहाना करून तिला घेऊन गेला. त्या ठिकाणी तिला मागून पकडून बळजबरीने अत्याचार केला. तसेच तसेच तिच्या घरी कुणीही नसताना देखील वेळोवेळी पुन्हा याच पद्धतीने अत्याचार केले. दरम्यान अत्याचार होत असल्याच्या कंटाळून पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईसह परिवारातील सदस्यांना सांगितला. पीडीतेसह तिची आई यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या सूचनेवरून पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी यांना नजाकत खान याच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहे.

 

Protected Content