भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थींनी जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाजवळील महाराष्ट्र बँक समोर अज्ञात चारचाकी वाहनाने पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीला जोरदार धडक देऊन गंभीर दुखापत केल्याची घटना घडली या प्रकरणी सोमवार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका कुमार जितेंद्रसिंग (वय-१७) रा. प्रज्ञा कॉलनी जळगाव ही विद्यार्थिनी सोमवार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मुळजी जेठा महाविद्यालयासमोरील महाराष्ट्र बँक जवळून पायी जात होती. त्यावेळी मागून येणारी चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ – ७१३४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत वंशिका हिच्या पायाला दुखापत झाली. तसेच कारचालक हा कार न थांबविता कार घेऊन पसार झाला होता. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी मुलीला मदत करत खाजगी वाहनातून रुग्णालयात रवाना केले. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता कार्यक्रमांक (एमएच १९ – ७१३४) वरील अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content