पाचोरा- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री बुद्रुक प्र.भ येथील महिला सरपंच मोनिका महेश पाटील ह्या अविश्वास सभेला सामोरे गेल्या नाही. व त्यांच्या विरोधात मतदान झाल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत.
तालुक्यातील पिंप्री बुद्रुक प्र.भ गावाच्या महिला सरपंच म्हणून मोनिका महेश पाटील ह्या कार्यरत आहे. मात्र त्या ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना विश्वासात घेत नाही, शासनाकडून आलेला निधी बाबत माहिती देत नाही, विकास कामांकडे दुर्लक्ष करतात अशी कारणे दाखवून २२ जुन रोजी ९ पैकी आठ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
यावर शुक्रवारी तहसिलदार प्रविण चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली विषेश सभेचे आयोजन करुन ठरावावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु याप्रसंगी सरपंच मोनिका महेश पाटील ह्या गैरहजर राहिल्या. म्हणून भागाबाई बळीराम पाटील, ज्योती रविंद्र पाटील, विमलबाई पांडू सोनवणे, सुनिता राजू मोरे, धनराज कैलास पाटील, बाळासाहेब वाल्मिक पाटील, राजू दौलत मोरे, अमित दशरथ पाटील ह्या आठ जणांनी अविस्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. यामुळे सरपंच मोनिका महेश पाटील हे सरपंच पदावरून पायउतार झाले. यावेळी अव्वल कारकून भरत पाटील, तलाठी डी. एस. खरात, ग्रामसेवक हेमंत पाटील यांनी सभेचे कामकाज पाहिले.