पाचोरा शहरात “शिव जयंती” उत्सवाचा आनंद शिगेला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वत्र सण उत्सव साजरे होत नव्हते. मात्र देशात कोरोना संपुष्टात आल्याने महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहेत.

अनुषंगाने शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची “शिव जयंती” असुन शिवरायांना मानाचा मुजरा म्हणुन पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील जय हिंद लेझीम मंडळाच्या सदस्यांनी गोराडखेडा रोडवरिल मातोश्री हॉटेल पासुन ते थेट भडगाव रोडवरील हाॅटेल स्वप्न शिल्प हॉटेलपर्यंत चक्क ३ रात्री जागरण करुन तीन कि.मी. अंतरावरील सुमारे २०० खंब्यांवर भगवे झेंडे लावुन एक अनोखी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातुन मोटरसायकल रॅली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर विविध कार्यक्रम, शहरातील विविध शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पुजन, व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीतच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची “शिव जयंती” ही शहरातील सर्वच समाज बांधव एकत्रित येवुन साजरी करत आहे.

Protected Content