रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर नगरपालिकेच्या मुख्यधिकारीपदी अभिजित कदम यांनी पदभार स्वीकारला आहे. मोखाळा (जि. पालघर) येथील नगर पंचायत मुख्याधिकारी पदावरून त्यांची बदली झाली असून, ते मूळचे देवळा (जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर कदम यांनी शहरातील अतिक्रमण हटवणे, पाणीपुरवठा, रस्ते आणि गटारांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. दर्जेदार विकासकामांसाठी स्वतः लक्ष घालणार असून, पालिकेत कोणत्याही प्रकारच्या कमिशनखोरीला थारा दिला जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने शहराच्या प्रगतीसाठी काम करण्याचा आपला मानस असल्याचे कदम यांनी सांगितले.