बारावी शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, आरोपीवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कॉलेजच्या गेटजवळून अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (११ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलगी बारावीचा पेपर देण्यासाठी सकाळी घरातून निघाली होती. मात्र, परीक्षा संपल्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या अनुपस्थितीची चिंता वाटून कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर मिळालेल्या माहितीतून समोर आले की, तुषार शत्रुघ्न पाटील (रा. येरवडा, ता. मुक्ताईनगर) याने तिला फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी तत्काळ मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तुषार पाटील याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संतोष चौधरी करीत आहेत.

Protected Content