आश्रय फाऊंडेशनतर्फे ‘थेंब अमृताचा’ मोहिमेस मदत

aashray foundation yawal

यावल प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या ‘थेंब अमृताचा’ या जलसंवर्धन मोहिमेस आश्रय फाऊंडेशनतर्फे ७५ हजार रूपयांची मदत सुपुर्द करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या रावेर आणी यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर जलसंकटाशी लढा देण्याकरीता लोकसहभागातुन ‘थेंब अमृताचा’ हे अभियान युद्धपातळीवर यशस्वीरित्या राबविण्यात येत असुन या समाजकार्यास रावेर आणी यावल या दोघ तालुक्यातील समाजसेवकांची उत्तम साथ मिळत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन नद्यांचे पुर्नभरण, नाला खोलीकरण, असे उपक्रम राबविले जात असलेल्या ‘थेंब अमृताचा’ या अभियानास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेला बळकट करण्याच्या दृष्टीकोणातुन यावल येथील युवा सामाजीक कार्यकर्ते यावल नगर परिषदचे नगरसेवक आणी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी या अभीयानास आपल्या आश्रय फाउंडेशन च्या वतीने थेंब अमृताचा या अभीयानास ७५, ००० हजाराची मदत केली आहे. या रकमेचा धनादेश महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांना सुपुर्द करण्यात आला.

या प्रसंगी डॉ.पराग पाटील, डॉ. नितिन महाजन, डॉ. भरत महाजन, डॉ. राजेश चौधरी, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. दिलीप भटकर, डॉ. अभीजीत सरोदे, डॉ. निलेश पाटील, डॉ. चेतन कोळंबे, डॉ. ताराचंद सावळे, डॉ. ललीत पाटील, डॉ. विलास पाटील, डॉ. शैलेश खाचणे, डॉ . प्रशांत भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content