हिंगोणा येथील पोटनिवडणूक घेण्याची माजी ग्रामपंचायत सदस्याची मागणी

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील वार्ड क्रमांक ४ मधील उमेदवार यांचे निधन झाल्याने त्या जागेवर यावल तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांनी पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अरमान तडवी यांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणूक गेल्यावर्षी पार पडली. यात वार्ड क्रमांक ४ मध्ये शेगमबाई नामदार तडवी या ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या. दरम्यान ४ एप्रिल २०२१ रोजी शेगमबाई तडवी हे मयत झाले. यासंदर्भात हिंगोणा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांनी १२ एप्रिल रोजी यावल तहसीलदार यांना याबाबत अहवाल सादर केला. ग्रामपंचायत सदस्या शेगमबाई तडवी ह्या मयत होवून आठ महिने झाले परंतू आद्यापपर्यंत यावल तहसील कार्यालयातून कोणतेही कागपत्रांचा पाठपुरावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेला नसल्याने पोटनिवडणूकीत तालुक्यातील हिंगोणा हे गाव वगळण्यात आले आहे.

पोटनिवडणूक होवू नये यासाठी गावातील काही राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी ही पोटनिवडणूक कोणाच्या सांगण्यावरून वगळण्यात आली, असे गावामध्ये तर्कवितर्क काढण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील तहसील महेश पवार यांच्याकडे हिंगोणा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अरमान तडवी हे वेळोवेळी जाऊन व तहसिलदार यांच्याशी पोटनिवडणुक घेण्यासंदर्भात चर्चा केली असता तहसीलदार यांनी सांगितले की, हे काम आमचे नाही, ग्रामपंचायतचे आहे. तुम्ही ग्रामपंचायतला भेटा व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना भेटा. असे सांगण्यात आले. माजी ग्रामपंचायत सदस्य अरमान तडवी यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, हिंगोणा येथील ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Protected Content